PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 30, 2024   

PostImage

Armori news: शेतात बोलावून महिलेचा विनयभंग


आरमोरी : शेतात महिला एकटीच असल्याचे पाहून आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील चामोर्शी (चक) गावाच्या शेतशिवारात घडली. महिलेच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी अशोक जनार्दन कारमिगे (४५) रा. चामोर्शी (चक) ता. आरमोरी याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालकाच्या शेतात खत शिल्लक आहे. ते जर पाहिजे असल्यास शेतात ये असे सांगितले. शेतात सोबत म्हणून पीडित महिलेने तिचा दीर याला सोबत घेतले होते. मात्र आरोपीने दिराला अर्ध्यात ठेवून महिलेला मालकाच्या शेतात नेले. खताची अर्धे पोते भरुन ते दिराकडे पोहचवून दिले. महिलेला शेतातच थांबण्यास सांगितले. खत पोहोचवून

अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरोपीला हाताने ढकलून दिले व आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करुन घराकडे परतली. घटनेची माहिती घरच्या लोकांना व शेतात निंदणी करत असलेल्या बायकांना सांगितली. पीडितेचे तोंडी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन आरमोरी येथे आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७६ अन्वये गुन्हा नोंद करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक केली. घटनेचा तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे, पोलिस हवालदार रजनीकांत पिल्लेवान करीत आहेत. आरोपी हा पीडित महिलेच्या नात्यातीलच आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 19, 2024   

PostImage

अखेर तरुणीला मारहाण करणाऱ्या फरार आरोपींना अटक


 

आरमोरी: दिनांक १५/०८/२०२४ रोजी बर्डी आरमोरी ता. आरमोरी येथील शिवम कॅफे येथे मोबाईल चार्जर दिला नाही या कारणावरून एका तरुणीस मारहाण करण्यात आली होती.

त्याबाबत दिनांक १७/०८/२०२४ रोजी प्रियंका सुकेंदू रॉय वय १९ वर्ष हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पो. स्टे आरोमारी येथे गुरक्र २१८/२४ कलम ७४,७९,११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी नामे १) सोहेल मेहमूद शेख २) अब्दुल अयुब नासिर शेख हे फरार झाले होते. गडचिरोली पोलिस दलाने सदर दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना आज दिनांक १९/०८/२०२४ रोजी सकाळी अटक केली अटकेनंतर दोन्ही आरोपितांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहे